हिरव्या हातांचा माणूस : गोविंद के. पाटील
हिरव्या हातांचा माणूस अर्थात काका कुलकर्णी आजची सकाळ ही नको असलेली अस्वस्थ बातमी घेऊन उगवलीय… माझ्या शेतघराच्या अवतीभवतीची नारळीची झाडं ज्यांनी भेट म्हणून पाठवली होती तो महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार विजेता हिरव्या हाताचा माणूस-गुंडोपंत तथा काका कुलकर्णी यांचा पुण्यात अटॅकने मृत्यू झाल्याची भयंकर बातमी कळली आणि डोक्यात आळवणींचं काहूर माजलंयकाळम्मावाडी डावा कालवा येण्याआधीचं नाधवडं गाव…ओढ्यालगतच्या […]














