सा हि त्या क्ष र

2021, ऑगस्ट

सॅन्दोर हालमोसी यांच्या कविता

सॅन्दोर हालमोसी यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद केला आहे, डॉ.संजय बोरुडे यांनी. लौकरच हा अनुवाद साहित्याक्षर प्रकाशनाच्या वतीने  प्रकाशित होत आहे१. संपूर्ण निरर्थकजवळजवळ सर्वच बोलून झाले आहे ..भूसुरुंगाच्या भोवती फिरताना असं क्वचित घडू शकतं,तुम्ही घाई करु शकता डोळे बंद करुन..असे आणखी कोणतेही विचार नाहीतज्यांचा स्फोट झाला नसता आणितुम्हाला मागे ओढायलाही कोणीही माणूस नसता जवळ.. ***  सॅन्दोर हालमोसी प्रमुख अतिथी म्हणून…   […]

2021, संप्टेंबर

बाबू बिरादार:मोठ्या प्रतिभेचा लेखक

बाबू बिरादार हे मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार आहेत हे उशिरा का होईना मराठी जाणकारांना जाणवले ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. अंबाजोगाई येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बैठकीत पुढील संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचा ठराव आला. त्यासाठी काही नावं पुढे आली.परंतु दगडू लोमटे,शेषराव मोहिते,आसाराम लोमटे आणि मी अशा चौघाजणांनी बाबू बिरादार यांच्या नावाचा आग्रह धरला.हे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी कसे योग्य

2022, जानेवारी

माई – चिनुक्स

१९९० सालची गोष्ट. मे महिन्यात, भर दुपारी एक बाई आमच्या घरी आल्या. ठिगळं लावलेलं लुगडं, रुपयाएवढं कुंकू आणि पायात चपला नाहीत. माझ्या बाबांशी, काहितरी काम होतं त्यांचं. या बाईंचं मोठ्या आवाजातलं बोलणं मला आत व्यवस्थित ऐकू येत होतं. त्यांचे कुठे कुठे ३-४ अनाथाश्रम होते, आणि तिथे राहणार्‍या मुलांसाठी त्यांना पैशांची आवश्यकता होती. बाबांचा कामानिमित्ताने अनेक

Scroll to Top