सा हि त्या क्ष र

2020, ऑगस्ट

राहत इंदोरी साहब : किरण काशीनाथ

 राहत इंदौरी….. काळाला ओळखणारा शायर. आज मशहूर, मेहबूब आणि बागीयाना शायर राहत इंदौरी यांचा मृत्यू झाल्याचे कळले.  मन खरोखरंच अतिशय दुःखी झाले आहे. त्यांच्या सोबत घालवीलेल्या काही क्षणांची आजही आठवण डोळ्यासमोर आहे…. रवायतों की सफ़े तोड़ कर आगे बढ़ो वर्ना  जो  तुमसे  आगे  है  वो  रास्ता  नहीं  देंगे l असे शेर जेव्हां मंचावरून ऐकतो किंवा […]

2020, ऑगस्ट

जेफ्री आर्चर : एक सुबोध लेखक

 आपल्याला इंग्रजी पुस्तक वाचण्याच्या आनंदात रंजकतेसोबत काहीसं अंतर्मुख व्हायचं असेल आणि माणूस नावाच्या प्राण्याचं मनोविश्लेषण करायची खुमखुमी असेल तर ‘ जेफ्री आर्चर ‘ सारखा लेखक जरूर वाचायला घ्यावा.  अत्यंत गुंतागुंतीची बाल्यावस्था जगायला लागली असेल तर पुढे जाऊन ती व्यक्ती एक माणूस म्हणून कसा घडू शकतो याचं एक चमत्कारिक उदाहरण म्हणून जेफ्रीच्या आयुष्याकडे पाहता येईल. सर्व

2020, सप्टेंबर

गॅब्रियल मार्क्वेझची कथा : भालचंद्र गुजर

अनेक मराठी व हिंदी लेखकांवर प्रभाव टाकणारे व नोबेल प्राईझ मिळवणारे प्रसिध्द आंतरराष्ट्रीय लेखक गॅब्रियेल गार्सिया मार्क्वेझ यांची जडणघडण सांगणारा हा लेख ‘रसिक ‘ दिवाळी अंकातून साभार

2020, ऑक्टोबर

आदिमाया” विषयी…: नाना किरतकर,अकोला

विदर्भातील प्रख्यात लेखक मा. अशोक राणा यांचा ‘आदिमाया’ हा ग्रंथ वाचण्यात आला. सदर ग्रंथामध्ये लेखकांनी ज्या ज्या संस्कृतीमध्ये मातृदेवता आढळतात त्या त्या संस्कृतीचा परामर्श घेतला. हा ग्रंथ म्हणजे लेखकाचे मातृसत्ताक संस्कृतीवरील संशोधन आहे. ह्या संशोधनाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी अनेक संदर्भ ग्रंथ वाचलेत असे दिसून येते. लेखक लिहितात की, प्राचीन भारतात आणि जगातील काही देशांत उदा: बॉबिलोनिया,

2020, नोव्हेंबर

द बॅड, एंजल आय, ली व्हान क्लीफ : अतुल ठाकूर

द बॅड म्हणुन काम केलेला “द गुड द बॅड अँड द अग्ली” मधील एंजल आय ली व्हान क्लीफ हा माझा अत्यंत आवडता अभिनेता. भिंगातुन सुर्यकिरण एकत्र होऊन कागदाला भोक पडावं तशी आरपार भेदुन जाणारी तीक्ष्ण नजर हे व्हान क्लीफचं बलस्थान. त्यातुन सर्जीयो लिऑनसारखा क्लोजअपवेडा दिगदर्शक मिळाल्यास पाहायलाच नको. सर्जियोने या नजरेचा वापर करुन पडद्यावर अनेकदा

2020, नोव्हेंबर

मनोहर सोनवणे नावाचा माणूस

१. मनोहर सोनवणे नावाचा माणूस १. २००३  मध्ये ‘यूनिक फीचर्स’मधे जॉईन झालो होतो. तिथं एका टेबलवर इनशर्ट केलेली, चेहर्यावर कोडाचे पांढरे डाग असलेली, डोक्यावरचे केस बहुधा कोडानेच पांढरे झालेली एक व्यक्ती सतत खाली मान घालून sincerely काम करताना दिसायची… तसे असले तरी, ऑफिसमधे कुठे हास्यविनोद झाला तर त्यात भाग घेऊन मधेच एखादा विनोदी चुटका करुन

2020, नोव्हेंबर

महात्मा फुले -स्त्री दृष्टीकोण : रचना

शतकानुशतकापासून परंपरागत जीवनपद्धती जगत आलेल्या समाजाला, अनिष्ट प्रथा अंगवळणी  पडलेल्या मानवाला, स्त्रीदास्य, ज्ञान ,सामाजिक विषमतेच्या भोवऱ्यात अस्तित्व हरवून बसलेल्या मानवी समाजाला बुद्धिप्रामाण्यवाद धर्माची समाजशास्त्रीय विश्लेषण आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा तत्वप्रणालीच्या आधारे नवसंजीवनी देऊन समाज-परिवर्तनाची कृतिशील पाळेमुळे रोवणारे महामानव म्हणून महात्मा फुले  यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल विसाव्या शतकातील तळागळातील समाजाचे उद्गगाते ,स्त्रीशिक्षणाचा जनक महात्मा फुले होय.    

2020, डिसेंबर

कियू बीच हाऊ यांच्या कविता

व्हिएतनाम येथील प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री एकूण १५ पुस्तके पैकी ११ कथासंग्रह. ‘द लास्ट साँग ‘ या कवितासंग्रहाचा इटालियन व इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध. व्हिएतनाम लेखक संघाच्या उपाध्यक्षा. १.माझ्या आत्म्या,साठी हे माझ्या आत्म्यामी तुझ्याशीशरीराने जोडले आहेकिती उबदार,किती रोमांचकारी मी तुझ्याशी जोडले आहेअशा विचारांनीआणि अजूनही आपणएकमेकात विरघळतो आहोत हजारो मैलांची दूरीहजारो शब्दांचे मौनतरीही आपणविणले आहे एक जाळेआपल्या

2021, जानेवारी

सातारा जिल्ह्यातील कामशिल्पे असणारी मंदिरे

मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारची तीन मंदिरे सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, परळी आणि कारखटाव येथे आजही आपले अस्तित्व टिकवून उभी आहेत. सर्वसमावेशक भारतीय तत्वज्ञानाची मूक साक्षीदार असलेली ही मंदिरे आपल्या समृद्ध कलेइतिहासाचा वारसा असून, यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे.आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे पर्यटनाचे साधन तसेच कलेइतिहासाचा वारसा म्हणून पाहिलं जातं.

2021, फेब्रुवारी

मुंबई, बंबई, बॉम्बे : LBGT चे संदर्भ

‘ मुंबई मुंबई बॉम्बे ‘ हा  डॉ.बाबासाहेब यांचा सुमारे १३३ पृष्ठांचा कवितासंग्रह ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केला असून त्यात सुमारे ११४कविता आहेत. अरुण कोलटकर,नामदेव ढसाळ थेट अरुण म्हात्रे पर्यंत अनेकांनी मुंबई आपापल्या पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते सारे कवी मुंबई येथे राहणारे होते .बाळासाहेब लबडे यांच्या निमित्ताने मुंबईकडे पाहणाऱ्या  परंतु मुंबई येथे वास्तव्य नसणाऱ्या 

2021, फेब्रुवारी

मनोहर शहाणे : व्यक्ती आणि वाड्मय

शहाणे, मनोहर यांचा जन्म १ मे, १९३० रोजी झाला. वयाची जवळजवळ आठ दशके नाशकात काढल्यानंतर आज ८९ वर्षे वय असलेले शहाणे  पुण्यात स्थायिक आहेत. साठनंतरच्या काळातील मराठीतील ते एक महत्त्वाचे कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार आहेत. नाशिक येथे सराफी व्यवसाय करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणी वडिलांच्या निधनानंतर आई- आजीने धुणीभांडी करून प्रपंच चालविला. आर्थिक

2021, फेब्रुवारी

बेळगावची कमल बस्ती (बसडी)

बेळगावात अनेक जैन मंदिरे आहेत.  त्या सर्वांपैकी कमल बस्ती अर्थात (बसडी ) येथील मंदिरे जबरदस्त आहेत. भूमिज शैलीतील या मंदिरांवरील नक्षीकाम, झुंबरं, वातायने प्रेक्षणीय आहेत. कर्नाटक च्या प्रमुख शहरांमध्ये मोजल्या जाणाऱ्या, बेळगाव शहराला एक हेवा वाटणारा वारसा आहे.  कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यामधील सांस्कृतिक मिलाफ या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. कित्येक वर्षांपासून बेळगाव येथील ऐतिहासिक

2021, मार्च

अंधत्वशाली जगाची ब्लाइंडनेस : प्रतीक महेंद्र कदम

अंधत्वशाली जगाची ब्लाइंडनेस : प्रतीक महेंद्र कदम  नोबेल पुरस्कार विजेते ‘ज्यूझे सारामागु’ यांची ‘ब्लाईंडनेस’ ही जगप्रसिद्ध आणि गाजलेली कादंबरी आहे. जगातील अनेक भाषेत कादंबरीचे अनुवाद झालेले आहेत. मुळची पोर्तुगीज भाषेत असणारी ही कादंबरी इंग्रजी भाषेत अनुवादित होऊन ती परत अनेक राष्ट्रीय भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे. यावरूनच आपल्याला कादंबरीची उंची आणि पोहोच समजून येते. कादंबरीची उंची

2021, मार्च

गणेश वनसागर: काळ्या मातीतला कलावंत

   गणेश वनसागर हा  नांदेडचा लोककलावंत.काळ्या मातीतला हा कलावंत काल कोरोनाचा बळी ठरला.अवघ्या पन्नासीत तो गेला. ही घटना चुटपूट लावणारी आहे.नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात असलेलं गोळेगाव. हे या कलावंताचं गाव.त्याला शालेय जीवनापासूनच नृत्य आणि नाट्याची विशेष आवड.गणेश वनसागर या कलावंताची पहिल्यांदा भेट झाली कथाकार मित्र दिगंबर कदम यांच्या लोकसंवाद मध्ये.बहुधा ते दुसरे अथवा तिसरे साहित्य

Scroll to Top