सांगलीचे वसंत केशव पाटील उर्फ वके सर हे हिंदी अनुवादक आणि ज्येष्ठ कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. मित्रवर्य अभिजीत पाटील यांच्या ‘ अबीर गुलाल ‘ या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहभाग नोंदवताना वकेंची ओळख झाली. त्या आधी त्यांना वाचून होतोच. नुकतेच ते ७५ त पदार्पण करत आहे त्याचे औचित्य साधून आभिजीतची प्रतिक्रिया आणि सरांच्या […]
नवा आश्वासक समीक्षा ग्रंथ – डॉ.अरुण ठोके,नाशिक
‘स्री जाणीवा आणि स्री संवेदना: एक अभ्यास’– नवा आश्वासक समीक्षा ग्रंथ – डॉ.अरुण शिवाजी ठोके (मराठी विभाग प्रमुख,के. के. वाघ कला, वाणिज्य विज्ञानआणि संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी,ता. निफाड,जि. नाशिक E mail- arunthoke26@gmail.com मोबा-९१७५१६४७९९)
उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली
उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली – डॉ.संजय बोरुडे प्रा.डॉ.शैलेश त्रिभुवन हे संपादित करत असलेल्या ‘सक्षम समीक्षा’ या त्रैमासिकाच्या ऑ.नो.डी.२०१९ च्या अंकात (ताज्या) डॉ.संजय बोरुडे यांनी लिहिलेला ‘उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली ‘ हा शैली वैज्ञानिक समीक्षालेख प्रकाशित झाला आहे.नगर जिल्ह्यातले पहिले साहित्य अकादमी विजेते लेखक म्हणजे प्रा.रंगनाथ पठारे म्हणजे समीक्षाकाना दमवणारे लेखक म्हणून परिचित आहेत.त्यांच्या शैलीचे अंतरंग उलगडवून दाखवणारा मराठीतील कदाचित
आठवें रंग का गुब्बारा -व्यक्तिवाद की सीमाये लांघनेवाली कविता
(विशाल अंधारे,लातूर यांच्या ‘आठवें रंग का गुब्बारा’ या हिंदी काव्यसंग्रहावर ‘साहित्यनामा’ या हिंदी अंकात आलेला रचना यांचा समीक्षालेख.साभार .-संपादक ,साहित्याक्षर ) आठवें रंग का गुब्बारा -व्यक्तिवाद की सीमाये लांघनेवाली कविताकविताएँ मन का सहजभाव होती है। कवि की गहरी सोच आला की तड़प न ,वेदनाओं की गर्जन, शब्दों में बांधकर पाठक के मन में उतरती है।कवि के मन में मची हलचल,
कविचं पोस्टमार्टेम – संजय चौधरी
(संग्रह येण्याच्या आधी ज्यांच्या कविता रसिकांच्या तोंडपाठ होत्या,असा कवी म्हणजे संजय चौधरी.’गंगेवरची म्हातारी’,’घावांचे गाव’,’मला जर मुलगी झाली तर तिचे नाव सीता ठेवणार नाही’,’एकदा पावूस दंगलीत सापडला’ ,’जे व्यासपीठावर असतात..‘अशा अनेक कविता रसिकांच्या पाठ आहेत आणि होत्या.’आभाराचा भार कशाला,आता फुलांचा हार कशाला?’ ही तर महाराष्ट्रात सर्वदूर पोचलेली कविता आभार प्रदर्शनात भेटते. मध्यंतरीच्या कालखंडात कवितेवर आलेली सूज पाहून,जाकिटे घालून
कब्रीतला समाधिस्थ :अलौकिकाची ओढ – डॉ. बाळासो. लबडे
महाकवी सुधाकर गायधनी जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या महाकवी सुधाकर गायधनी यांचा हा पहिला संग्रह आजपासून बरोबर ४६ वर्षापूर्वी प्रकाशित झाला .त्याची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली असून त्या निमित्ताने आजचा ब्लॉग लिहिला आहे,सुप्रसिद्ध कवी डॉ.बाळासाहेब लबडे यांनी.विशेष म्हणजे हा कविता संग्रह गायधनी यांना स्वत:लाच एम.ए.ला अभ्यासाला होता.मराठी साहित्यात हा पहिलाच योगायोग होता.सुधाकर गायधनी यांच्या ‘महावाक्य’ या ग्रंथामुळे डॉ.प्रल्हाद वडेर,निर्मलकुमार फडकुले,द.भि.कुलकर्णी,के.ज.पुरोहित,वि.स.जोग,सदानंद मोरे यांनी
खोट्याला बळी पडून द्वेषाला निमंत्रण देतोय? – डॉ.महेंद्र कदम
(श्री.संजय आवटे ,संपादक,दिव्य मराठी यांनी काल त्यांच्या फेसबुकवर लेख टाकला आहे, त्यावरची ही डॉ. महेंद्र कदम यांची प्रतिक्रिया.संपादक त्या मताशी सहमत असतीलच, असे नाही. ज्यांना संजय आवटे यांचा मूळ लेख वाचायचा आहे त्यांच्यासाठी लेखाची लिंक -https://m.facebook.com/story.php?story_fbid=10158230460284919&id=715559918 ) खोट्याला बळी पडून द्वेषाला निमंत्रण देतोय?
महावीर जोंधळे:सत्वशील जगण्याचा पाठपुरावा!- डॉ.जगदीश कदम
महावीर (भाई ) जोंधळे (आज महावीर जोंधळे उर्फ भाई यांचा वाढदिवस .त्याचे औचित्य साधून नांदेडचे प्रख्यात साहित्यिक डॉ.जगदीश कदम यांनी ही भावना काव्यात्म शैलीत व्यक्त केली आहे.-संपादक,साहित्याक्षर.) महावीर जोंधळे:सत्वशील जगण्याचा पाठपुरावा! 🎍🎍🎍 महावीर जोंधळे उर्फ महावीर भाई आता सत्तर वर्षांचे झाले.पाहता पाहता आड्यावर बसलेल्या चिमणीसारखा सगळा भूतकाळ भुर्कन उडून गेला.भाईंचा भुईशी चिकटून असलेला प्रवास दिसायला लागला लख्ख.तीसेक वर्षांपासूनचा भाईंशी
अनुभवावा असा कालिंदीचा डोह – वसंत शिंदे,सातारा
‘ कालिंदीच्या डोहातून’या किशोर मुघल लिखित काव्यसंग्रहाचा परिचय – वसंत शिंदे,सातारा (या लेखात व्यक्त केलेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही – संपादक, साहित्याक्षर ) कालिंदीच्या डोहातून हा किशोर मुगल यांचा काव्यसंग्रह हाती येऊन आता बरेच दिवस लोटले आहेत. परंतु त्यावर विस्ताराने लिहायचं आज मनाने घेतलेलं दिसते आहे. किशोर मुगल हा माझा साहित्य
राजन गवस नावाचा माणूस : एकनाथ पाटील
प्रख्यात साहित्यिक राजन गवस निवृत्त झाले त्या वेळी लिहिलेला लेख. संवेदनशील लेखक, हाडाचा शिक्षक आणि आस्थेचा परिघ विस्तारणारा माणूस. कसलाही गाजावाजा नाही, भपका नाही, बडेजाव नाही, हारतुरे नाहीत, शाली नाहीत की कौतुकाची भाषणं नाहीत आणि अत्यंत साधेपणाने ‘गवस गुरुजी’ सेवानिवृत्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या माणसाची ही अशी सेवानिवृत्ती कदाचित अनेकांना आश्चर्यकारक वाटली असेल. पण
ज्येष्ठ समीक्षक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या ग्रंथाचा परिचय : प्रा.केदार कळवणे
(काल ११ एप्रिल.म.फुल्यांचा जन्मदिन.याच दिवशी प्रस्तुत लेख प्रकाशित करायचा होता.डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या या महत्त्वाच्या ग्रंथाचा परिचय करून देणारा आजचा ब्लॉग लिहिला आहे,प्रा.केदार कळवणे यांनी.दह्ण्य्वाद.-संपादक,साहित्याक्षर ) बहुजन संस्कृतीचे सारसूत्र लेखक,समीक्षक,कवी, विचारवंत,वक्ते आणि प्रशासक प्रल्हाद जी.लुलेकर यांनी हयातभर लेखणी,वाणी आणि प्रशासनातून सम्यक परिवर्तनाची विद्रोही भूमिका मांडली.फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा घेऊन अविरत लोकजागृती घडवत साहित्यालाही नवी दृष्टी देण्याचा सातत्याने प्रयत्न केला.प्रामुख्याने शोषितांचे प्रश्न आणि साहित्य हा त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू राहिला आहे.त्यांनी सामाजिक समतेसाठी विद्रोही तत्वज्ञानशास्राची मांडणी प्रभावीपणे केली आहे.‘आले ढग…गेले ढग ‘ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे.‘मोगडा’ आणि ‘दलितेतरांसाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर’या त्यांच्या वैचारिक लेखनाने मराठी विचारविश्वात मोलाची भर टाकलेली आहे.‘बलुतेदार’, ‘गावगाड्याचे शिल्पकार’व ‘बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे’हे त्यांचे ग्रंथ गावगाड्याच्या समाजशास्रीय, संस्कृतीशास्रीय आणि भाषाशास्रीय अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जातात.‘वेदनांचा प्रदेश’,‘प्रतिभेचे प्रदेश’,‘पंचधारांचा प्रदेश’,‘साहित्याचे वर्तन आणि वर्तमान’,‘भंजनाचे भजन’,साठोत्तरी साहित्य प्रवाह’आदी ग्रंथांतून त्यांनी परिवर्तनवादी दृष्टीकोनातून केलेली साहित्य समीक्षा आणि केलेले चिकित्सक संशोधन दिशादर्शक व मूलभूत स्वरूपाचे आहे. दलित आत्मकथने,साठोत्तरी साहित्य प्रवाह, मराठवाड्यातील साहित्य,बारा बलुतेदार आणि गावगाडा,परिवर्तनवादी चळवळी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या विषयाच्या अवकाशात त्यांनी केलेला अभ्यास मराठी साहित्यात महत्त्वाचा मानला जातो.जवळपास पंचविस ग्रंथांच्या माध्यमातून त्यांचे साहित्य आणि समाजचिंतन वाचकांसमोर आलेले आहे.या संबंध लेखनाच्या केंद्रस्थानी वंचित समुहांचा विचार राहिलेला आहे.समाजप्रश्नांच्या बद्दल भारतीय संविधानातील तत्त्वांचा अंगिकार करत त्यांनी केलेला साहित्यिक हस्तक्षेप लोकशाहीवादी समाजनिर्माणासाठी आवश्यक आहे.नुकताच त्यांचा‘बहुजन संस्कृतीचे जनक:महात्मा जोतीराव फुले’हा ग्रंथ प्रसिध्द झाला आहे.हा ग्रंथही मानवी मूल्यांसाठी आग्रही असणार्या आणि समताधिष्ठित समाजरचनेचे स्वप्न पाहणार्या जोतीराव गोविंदराव फुले या माहात्म्याच्या कार्याचे सर्वव्यापीत्त्व विशद करणारा आहे.महात्मा फुले यांनी बहुजन समूहांच्या आयुष्यात घडवून आणलेली क्रांती आणि त्यांच्या संस्कृती निर्माणासाठी घेतलेल्या भूमिकांचा वस्तुनिष्ठ परामर्श प्रल्हाद लुलेकर यांनी प्रस्तुत ग्रंथातून घेतलेला आहे.महात्मा फुले यांच्या कार्याचे बहुजनवादी दृष्टीकोनातून मांडलेले हे आकलन ‘फुलेविचार’समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.या ग्रंथातून बहुजन संस्कृतीचे सारसूत्र विशद झाले आहे.म्हणून या ग्रंथाचे मोल लक्षात घेणे आवश्यक आहे. महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि पर्यायी संस्कृतीचा कृतिकार्यक्रम देणारे,शोषणमुक्त समाजरचनेचे स्वप्न पाहणारे दृष्टे विचारवंत आहेत.कृती व लेखनातून बहुजनवादी परंपरेची पुनर्मांडणी करणारे समाजसुधारक आणि लेखक आहेत.त्यांनी सामाजिक समतेचा आग्रह धरत आणि बहुजनांसाठी न्यायाची भूमिका घेत लोकशाही व्यवस्थेचा पाया घातला.शूद्र,अतिशूद्र आणि स्रीयांच्या मुक्तीसाठी हयातभर कार्य करत बहुजन संस्कृतीला आकार दिला.शेती,पाणी,शिक्षण,उद्योग, अर्थ,धर्म, जात,इतिहास,स्री प्रश्न आदीसंबंधाने त्यांनी केलेले कार्य आणि व्यक्त केलेले विचार हे बहुजनकेंद्री आधुनिक भारताच्या घडणीला दिशा देणारे आहे.समकालीन वास्तव आणि इतिहासाची चिकित्सा करत त्यांनी लिहिलेले साहित्य हे आधुनिक मूल्यविचार प्रकट करणारे आणि बहुजनांच्या हक्काची भाषा बोलणारे मूलभूत सृजन आहे.सामाजिक न्याय हे मूल्य त्यांच्या संपूर्ण बहुजनवादी कार्याच्या केंद्रव्रती आहे.या मूल्यांचा आग्रह धरत त्यांनी आधुनिक भारताची पायाभरणी केली. याच कार्यसूत्राला केंद्रव्रती ठेवत प्रल्हाद जी.लुलेकर यांनी सदर ग्रंथाची मांडणी केलेली आहे.आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतीकारक; तसेच बहुजन समाजाच्या सर्वकष परिवर्तनाचे नायक म्हणून महात्मा फुले यांच्या कार्याची यथोचित मांडणी या ग्रंथातून झालेली आहे. पाच दीर्घ लेखाच्या माध्यमातून हा दोनशे अठ्ठेचाळीस पृष्ठांचा ग्रंथ सिध्द झालेला आहे.‘जोतिराव फुले यांचे पहिले चरित्र’हा या ग्रंथातील पहिला लेख.तो पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी १९२७ साली लिहिलेल्या ‘महात्मा जोतीराव फुले’या चरित्राचा वेध घेणारा आहे.या लेखातून फुले चरित्रलेखनाच्या प्रयत्नाचा आढावा घेत पंढरीनाथ पाटील यांनी प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या पहिल्या विस्तृत चरित्राच्या सामर्थ्यस्थळांची चिकित्सक मीमांसा केलेली आहे.पाटील यांची कारकीर्द आणि व्यक्तिमत्त्वाचाही परिचय यानिमित्ताने करून दिलेला आहे.चरित्रलेखनाच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करून मूल्यमापन केल्याने हा लेख या चरित्राचे महत्त्व विशद करणारा आहे.बहुजनांचे नायक म्हणून पंढरीनाथ पाटील यांनी रेखाटलेले फुलेचरित्र हा सत्यशोधक चळवळीचा अनमोल दस्तऐवज असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण लुलेकर यांनी नोंदवलेले आहे.महात्मा फुले यांनी बहुजन संस्कृतीला कशारीतीने आकार दिला याचेही सूचन या लेखातून होते.त्यामुळे सदर ग्रंथातील हा पहिलाच लेख महात्मा फुले बहुजन संस्कृतीचे जनक कसे आहेत,याचे अधोरेखन करणारा आहे. ‘बहुजन संस्कृतीचे जनक’हा एक्क्याऐंशी पृष्ठांचा दुसरा दीर्घलेख या ग्रंथातील बीजलेख आहे.बहुजन संस्कृतीच्या जनकत्त्वाची मूलगामी चर्चा या लेखातून झालेली आहे.‘बहुजन’हा शब्द महाराष्ट्रात फारच ढोबळपणाने वापरला जातो.त्याची व्याख्या-व्याप्ती सांगण्याचा अनेकांनी प्रयत्न केला;परंतु त्यातून नेमकेपणाने ही संकल्पना स्पष्ट होऊ शकलेली नाही.या संकल्पनेचा सर्वसमावेशक व अचूक अर्थ प्रथमच या लेखातून विशद झालेला आहे.‘शोषण’हाच बहुजनवादाचा मूलाधार असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन प्रल्हाद लुलेकर यांनी केलेले आहे.शोषित समूहांच्या मुक्तीसाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची नोंद करून ते बहुजनवादाचे आद्यप्रवर्तक कसे ठरतात,याचे साधार विवेचन या लेखातून आलेले आहे.समता,बंधुता, मानवता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या स्वीकारासह शोषणमुक्त झालेल्या बहुजनांची ती‘बहुजन संस्कृती’असे सांगून ही संस्कृती महात्मा फुले यांनी कशाप्रकारे घडवलेली आहे,याचे विस्ताराने विवेचन प्रल्हाद लुलेकर यांनी केलेले आहे.‘बहुजन’ संकल्पनेचे केलेले विश्लेषण आणि त्याधारे महात्मा फुले यांच्या बहुजनवादी कार्यदृष्टीची केलेली मांडणी मराठी वैचारिक लेखनाला नवा विचारगर्भ आशय देणारी आहे.
बाबासाहेबांच्या प्रेरणेने सिलिंडर वाहक कवी झाला
नागपूरमध्ये सिलिंडर वाहणारा संजय गोडघाटे (आज दि.१४ एप्रिल.बाबासाहेबांच्या प्रेरणेने कवी झालेल्या सिलिंडर वाहक तरुणाचा प्रेरणादायी प्रवास रेखाटणारा आजचा ब्लॉग स्वत:च संजय गोडघाटे यांनी लिहिला आहे.लेखात व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.- संपादक,साहित्याक्षर) बाबासाहेबांच्या प्रेरणेने कवी झालो – संजय गोडघाटे साधारणतः मी पाचवी सहावीत असेल तेव्हाची गोष्ट…… आम्ही भाड्याच्या खोलीत राहायचो, आई वडील दोन
निडो तानियाम्स याची हत्या आणि नॉर्थ इस्ट : दगडू लोमटे
निडो तानियाम्स याची हत्याआणि नॉर्थ इस्ट :काही अनुभव … गेल्या २०१३ या वर्षात मार्च व एप्रिल या महिन्यात मी आणि माझे ३२ सहकारी अनिल हेब्बर याच्या नेतृत्व खाली नॉर्थ इस्टच्या दोऱ्यात होतो. अरुणाचल ते शांतीनिकेतन अशी ही “भारत जोडो मैत्री यात्रा” होती. या यात्रेचा मूख्य उद्येश हा याभागातील परस्थिती आणि त्यावर काय करता येईल का? असा विचार
वडगाव लाईव्ह : एक अस्वस्थ अनुभव
वडगाव लाईव्ह : एक अस्वस्थ अनुभव नांदेडच्या साहित्यिक,सांस्कृतिक वैभवात भर घालणारे जगदीश कदम सर,यांनी त्यांचे ‘वडगाव लाईव्ह’ हे दोन अंकी नाटक उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिले होते.ते नुकतेच वाचून काढले.छोट्या गावाची मोठी गोष्ट त्यांनी या संहितेत उभी केली आहे.कठोर ग्रामवास्तवावर ही गोष्ट बेतलेली.अशा गोष्टी मी फार जवळून अनुभवतो. आरक्षणाचा आधारवड घेवून इथले राजकारण
कोरोनाचा विळखा : नितीन माधव
(नितीन माधव हे एक मुक्त आणि अभ्यासू पत्रकार आहेत,इलेक्ट्रोनिक तसेच प्रिंट मीडियाचा त्यांना अनुभव आहे.त्यांनी हा आजचा ब्लॉग लिहिलाहे.मात्र या लेखात त्यांनी व्यक्त केलेल्या मतांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.- संपादक,साहित्याक्षर.) कोरोनाचा विळखा.. पत्रकाराच्या नजरेतून सध्या आपल्या भोवती जे काही घडतय, ते ना काल्पनिक आहे ना योगायोग. डिसेंबरच्या 31 तारखेला चीनसह जगभरात नव्या वर्षाचा जल्लोष साजरा केला गेला. सर्वच न्यूज चॅनल्सच्या














