सा हि त्या क्ष र

2020

2020, एप्रिल

अनुभवावा असा कालिंदीचा डोह – वसंत शिंदे,सातारा

   ‘ कालिंदीच्या डोहातून’या किशोर मुघल लिखित काव्यसंग्रहाचा परिचय – वसंत शिंदे,सातारा (या लेखात व्यक्त केलेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही – संपादक, साहित्याक्षर )            कालिंदीच्या डोहातून हा किशोर मुगल यांचा काव्यसंग्रह हाती येऊन आता बरेच दिवस लोटले आहेत. परंतु त्यावर विस्ताराने लिहायचं आज मनाने घेतलेलं दिसते आहे.  किशोर मुगल हा माझा साहित्य […]

2020, एप्रिल

राजन गवस नावाचा माणूस : एकनाथ पाटील

   प्रख्यात साहित्यिक राजन गवस निवृत्त झाले त्या वेळी लिहिलेला लेख.  संवेदनशील लेखक, हाडाचा शिक्षक आणि आस्थेचा परिघ विस्तारणारा माणूस.  कसलाही गाजावाजा नाही, भपका नाही, बडेजाव नाही, हारतुरे नाहीत, शाली नाहीत की  कौतुकाची भाषणं नाहीत आणि अत्यंत साधेपणाने ‘गवस गुरुजी’  सेवानिवृत्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या माणसाची ही अशी सेवानिवृत्ती कदाचित अनेकांना आश्चर्यकारक वाटली असेल. पण

2020, एप्रिल

ज्येष्ठ समीक्षक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या ग्रंथाचा परिचय : प्रा.केदार कळवणे

(काल ११ एप्रिल.म.फुल्यांचा जन्मदिन.याच दिवशी प्रस्तुत लेख प्रकाशित करायचा होता.डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या या महत्त्वाच्या ग्रंथाचा परिचय करून देणारा आजचा ब्लॉग लिहिला आहे,प्रा.केदार कळवणे यांनी.दह्ण्य्वाद.-संपादक,साहित्याक्षर )  बहुजन संस्कृतीचे सारसूत्र लेखक,समीक्षक,कवी, विचारवंत,वक्ते आणि प्रशासक प्रल्हाद जी.लुलेकर यांनी हयातभर लेखणी,वाणी आणि प्रशासनातून सम्यक परिवर्तनाची विद्रोही भूमिका मांडली.फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा घेऊन अविरत लोकजागृती घडवत साहित्यालाही नवी दृष्टी देण्याचा सातत्याने प्रयत्न केला.प्रामुख्याने शोषितांचे प्रश्न आणि साहित्य हा त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू राहिला आहे.त्यांनी सामाजिक समतेसाठी विद्रोही तत्वज्ञानशास्राची मांडणी प्रभावीपणे केली आहे.‘आले ढग…गेले ढग ‘ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे.‘मोगडा’ आणि ‘दलितेतरांसाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर’या त्यांच्या वैचारिक लेखनाने मराठी विचारविश्वात मोलाची भर टाकलेली आहे.‘बलुतेदार’, ‘गावगाड्याचे शिल्पकार’व ‘बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे’हे त्यांचे ग्रंथ गावगाड्याच्या समाजशास्रीय, संस्कृतीशास्रीय आणि भाषाशास्रीय अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जातात.‘वेदनांचा प्रदेश’,‘प्रतिभेचे प्रदेश’,‘पंचधारांचा प्रदेश’,‘साहित्याचे वर्तन आणि वर्तमान’,‘भंजनाचे भजन’,साठोत्तरी साहित्य प्रवाह’आदी ग्रंथांतून त्यांनी परिवर्तनवादी दृष्टीकोनातून केलेली साहित्य समीक्षा आणि केलेले चिकित्सक संशोधन दिशादर्शक व मूलभूत स्वरूपाचे आहे.    दलित आत्मकथने,साठोत्तरी साहित्य प्रवाह, मराठवाड्यातील साहित्य,बारा बलुतेदार आणि गावगाडा,परिवर्तनवादी चळवळी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या विषयाच्या अवकाशात त्यांनी केलेला अभ्यास मराठी साहित्यात महत्त्वाचा मानला जातो.जवळपास पंचविस ग्रंथांच्या माध्यमातून त्यांचे साहित्य आणि समाजचिंतन वाचकांसमोर आलेले आहे.या संबंध लेखनाच्या केंद्रस्थानी वंचित समुहांचा विचार राहिलेला आहे.समाजप्रश्नांच्या बद्दल भारतीय संविधानातील तत्त्वांचा अंगिकार करत त्यांनी केलेला साहित्यिक हस्तक्षेप लोकशाहीवादी समाजनिर्माणासाठी आवश्यक आहे.नुकताच त्यांचा‘बहुजन संस्कृतीचे जनक:महात्मा जोतीराव फुले’हा ग्रंथ प्रसिध्द झाला आहे.हा ग्रंथही मानवी मूल्यांसाठी आग्रही असणार्या आणि समताधिष्ठित समाजरचनेचे स्वप्न पाहणार्या जोतीराव गोविंदराव फुले या माहात्म्याच्या कार्याचे सर्वव्यापीत्त्व विशद करणारा आहे.महात्मा फुले यांनी बहुजन समूहांच्या आयुष्यात घडवून आणलेली क्रांती आणि त्यांच्या संस्कृती निर्माणासाठी घेतलेल्या भूमिकांचा वस्तुनिष्ठ परामर्श प्रल्हाद लुलेकर यांनी प्रस्तुत ग्रंथातून घेतलेला आहे.महात्मा फुले यांच्या कार्याचे बहुजनवादी दृष्टीकोनातून मांडलेले हे आकलन ‘फुलेविचार’समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.या ग्रंथातून बहुजन संस्कृतीचे सारसूत्र विशद झाले आहे.म्हणून या ग्रंथाचे मोल लक्षात घेणे आवश्यक आहे.          महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि पर्यायी संस्कृतीचा कृतिकार्यक्रम देणारे,शोषणमुक्त समाजरचनेचे स्वप्न पाहणारे दृष्टे विचारवंत आहेत.कृती व लेखनातून बहुजनवादी परंपरेची पुनर्मांडणी करणारे समाजसुधारक आणि लेखक आहेत.त्यांनी सामाजिक समतेचा आग्रह धरत आणि बहुजनांसाठी न्यायाची भूमिका घेत लोकशाही व्यवस्थेचा पाया घातला.शूद्र,अतिशूद्र आणि स्रीयांच्या मुक्तीसाठी हयातभर कार्य करत बहुजन संस्कृतीला आकार दिला.शेती,पाणी,शिक्षण,उद्योग, अर्थ,धर्म, जात,इतिहास,स्री प्रश्न आदीसंबंधाने त्यांनी केलेले कार्य आणि व्यक्त केलेले विचार हे बहुजनकेंद्री आधुनिक भारताच्या घडणीला दिशा देणारे आहे.समकालीन वास्तव आणि इतिहासाची चिकित्सा करत त्यांनी लिहिलेले साहित्य हे आधुनिक मूल्यविचार प्रकट करणारे आणि बहुजनांच्या हक्काची भाषा बोलणारे मूलभूत सृजन आहे.सामाजिक न्याय हे मूल्य त्यांच्या संपूर्ण बहुजनवादी कार्याच्या केंद्रव्रती आहे.या मूल्यांचा आग्रह धरत त्यांनी आधुनिक भारताची पायाभरणी केली.            याच कार्यसूत्राला केंद्रव्रती ठेवत प्रल्हाद जी.लुलेकर यांनी सदर ग्रंथाची मांडणी केलेली आहे.आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतीकारक; तसेच बहुजन समाजाच्या सर्वकष परिवर्तनाचे नायक म्हणून महात्मा फुले यांच्या कार्याची यथोचित मांडणी या ग्रंथातून झालेली आहे.          पाच दीर्घ लेखाच्या माध्यमातून हा दोनशे अठ्ठेचाळीस पृष्ठांचा ग्रंथ सिध्द झालेला आहे.‘जोतिराव फुले यांचे पहिले चरित्र’हा या ग्रंथातील पहिला लेख.तो पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी १९२७ साली लिहिलेल्या ‘महात्मा जोतीराव फुले’या चरित्राचा वेध घेणारा आहे.या लेखातून फुले चरित्रलेखनाच्या प्रयत्नाचा आढावा घेत पंढरीनाथ पाटील यांनी प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या पहिल्या विस्तृत चरित्राच्या सामर्थ्यस्थळांची चिकित्सक मीमांसा केलेली आहे.पाटील यांची कारकीर्द आणि व्यक्तिमत्त्वाचाही परिचय यानिमित्ताने करून दिलेला आहे.चरित्रलेखनाच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करून मूल्यमापन केल्याने हा लेख या चरित्राचे महत्त्व विशद करणारा आहे.बहुजनांचे नायक म्हणून पंढरीनाथ पाटील यांनी रेखाटलेले फुलेचरित्र हा सत्यशोधक चळवळीचा अनमोल दस्तऐवज असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण लुलेकर यांनी नोंदवलेले आहे.महात्मा फुले यांनी बहुजन संस्कृतीला कशारीतीने आकार दिला याचेही सूचन या लेखातून होते.त्यामुळे सदर ग्रंथातील हा पहिलाच लेख महात्मा फुले बहुजन संस्कृतीचे जनक कसे आहेत,याचे अधोरेखन करणारा आहे.           ‘बहुजन संस्कृतीचे जनक’हा एक्क्याऐंशी पृष्ठांचा दुसरा दीर्घलेख या ग्रंथातील बीजलेख आहे.बहुजन संस्कृतीच्या जनकत्त्वाची मूलगामी चर्चा या लेखातून झालेली आहे.‘बहुजन’हा शब्द महाराष्ट्रात फारच ढोबळपणाने वापरला जातो.त्याची व्याख्या-व्याप्ती सांगण्याचा अनेकांनी प्रयत्न केला;परंतु त्यातून नेमकेपणाने ही संकल्पना स्पष्ट होऊ शकलेली नाही.या संकल्पनेचा सर्वसमावेशक व अचूक अर्थ प्रथमच या लेखातून विशद झालेला आहे.‘शोषण’हाच बहुजनवादाचा मूलाधार असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन प्रल्हाद लुलेकर यांनी केलेले आहे.शोषित समूहांच्या मुक्तीसाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची नोंद करून ते बहुजनवादाचे आद्यप्रवर्तक कसे ठरतात,याचे साधार विवेचन या लेखातून आलेले आहे.समता,बंधुता, मानवता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या स्वीकारासह शोषणमुक्त झालेल्या बहुजनांची ती‘बहुजन संस्कृती’असे सांगून ही संस्कृती महात्मा फुले यांनी कशाप्रकारे घडवलेली आहे,याचे विस्ताराने विवेचन प्रल्हाद लुलेकर यांनी केलेले आहे.‘बहुजन’ संकल्पनेचे केलेले विश्लेषण आणि त्याधारे महात्मा फुले यांच्या बहुजनवादी कार्यदृष्टीची केलेली मांडणी मराठी वैचारिक लेखनाला नवा विचारगर्भ आशय देणारी आहे.  

2020, एप्रिल

बाबासाहेबांच्या प्रेरणेने सिलिंडर वाहक कवी झाला

 नागपूरमध्ये सिलिंडर वाहणारा संजय गोडघाटे  (आज दि.१४ एप्रिल.बाबासाहेबांच्या प्रेरणेने कवी झालेल्या सिलिंडर वाहक तरुणाचा प्रेरणादायी प्रवास रेखाटणारा आजचा ब्लॉग स्वत:च संजय गोडघाटे यांनी लिहिला आहे.लेखात व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.- संपादक,साहित्याक्षर) बाबासाहेबांच्या प्रेरणेने कवी झालो – संजय गोडघाटे  साधारणतः मी पाचवी सहावीत असेल तेव्हाची गोष्ट…… आम्ही भाड्याच्या खोलीत राहायचो, आई वडील दोन

2020, एप्रिल

निडो तानियाम्स याची हत्या आणि नॉर्थ इस्ट : दगडू लोमटे

निडो तानियाम्स याची हत्याआणि नॉर्थ इस्ट :काही अनुभव … गेल्या २०१३ या वर्षात मार्च व एप्रिल या महिन्यात मी आणि माझे ३२ सहकारी अनिल हेब्बर  याच्या नेतृत्व खाली नॉर्थ इस्टच्या दोऱ्यात होतो. अरुणाचल ते शांतीनिकेतन अशी ही “भारत जोडो मैत्री यात्रा” होती. या यात्रेचा मूख्य उद्येश हा याभागातील परस्थिती आणि त्यावर काय करता येईल का? असा विचार

2020, एप्रिल

वडगाव लाईव्ह : एक अस्वस्थ अनुभव

 वडगाव लाईव्ह : एक अस्वस्थ अनुभव       नांदेडच्या साहित्यिक,सांस्कृतिक वैभवात भर घालणारे जगदीश कदम सर,यांनी त्यांचे ‘वडगाव लाईव्ह’ हे दोन अंकी नाटक उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिले होते.ते नुकतेच वाचून काढले.छोट्या गावाची मोठी गोष्ट त्यांनी या संहितेत उभी केली आहे.कठोर ग्रामवास्तवावर ही गोष्ट बेतलेली.अशा गोष्टी मी फार जवळून अनुभवतो. आरक्षणाचा आधारवड घेवून इथले राजकारण

2020, एप्रिल

कोरोनाचा विळखा : नितीन माधव

(नितीन माधव हे एक मुक्त आणि अभ्यासू पत्रकार आहेत,इलेक्ट्रोनिक तसेच प्रिंट  मीडियाचा त्यांना अनुभव आहे.त्यांनी हा आजचा ब्लॉग लिहिलाहे.मात्र या लेखात त्यांनी व्यक्त केलेल्या मतांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.- संपादक,साहित्याक्षर.) कोरोनाचा विळखा.. पत्रकाराच्या नजरेतून सध्या आपल्या भोवती जे काही घडतय, ते ना काल्पनिक आहे ना योगायोग. डिसेंबरच्या 31 तारखेला चीनसह जगभरात नव्या वर्षाचा जल्लोष साजरा केला गेला. सर्वच न्यूज चॅनल्सच्या

2020, एप्रिल

हिरव्या हातांचा माणूस : गोविंद के. पाटील

 हिरव्या हातांचा माणूस  अर्थात काका कुलकर्णी  आजची सकाळ ही नको असलेली अस्वस्थ बातमी घेऊन उगवलीय… माझ्या शेतघराच्या अवतीभवतीची नारळीची झाडं ज्यांनी भेट म्हणून पाठवली होती तो महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार विजेता हिरव्या हाताचा माणूस-गुंडोपंत तथा काका कुलकर्णी यांचा पुण्यात अटॅकने मृत्यू झाल्याची भयंकर बातमी कळली आणि डोक्यात आळवणींचं काहूर माजलंयकाळम्मावाडी डावा कालवा येण्याआधीचं नाधवडं गाव…ओढ्यालगतच्या

2020, एप्रिल

डागी (डागाळलेले) पुरस्कार : विठ्ठल सोनवणे

 डागी (डागाळलेले) पुरस्कार : विठ्ठल सोनवणे (या लेखात व्यक्त झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)   .पुरस्कार, सन्मान, किंवा बक्षीस हे शब्द आनंद वाढवतात. मनाला सुखावतात. ज्या कोणा अबालव्रूद्धाला असा पुरस्कार मिळतो. त्याच्या तपसाधनेचे चीज होते. श्रमाचे फलित मिळते. सर्वात महत्त्वाचे आणखी पुढे काम करण्यास बळ येते. मात्र याबाबत खेदाने काही गोष्टी लिहाव्या वाटतात.आज साहित्य. जगतात पुरस्काराची रेलचेल

2020, एप्रिल

पीळ:अस्वस्थ वर्तमानाची कविता : डॉ.जगदीश कदम

(ब्लॉगवरील लेखात व्यक्त केलेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच,असे नाही-संपादक,साहित्याक्षर )   पीळ:अस्वस्थ वर्तमानाची कविता: डॉ.जगदीश कदम     सुनील यावलीकर हे चित्रकार म्हणून  विख्यात आहेत.माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याच्या अवतीभोवती जगण्याचा पसारा मांडणा-या रेषाकृती ही त्यांच्या रेखाचित्रांची खाशियत राहिलेली आहे, असे त्यांच्या चित्रांविषयीचे आमचे निरीक्षण आहे.या मुळात चित्रकार असलेल्या कवीची कविता सुध्दा हाच आशय गाभा अग्रस्थानी ठेवणारी आहे.माणूस आणि त्याच्या इतस्ततः

2020, एप्रिल

पुस्तकांच्या कविता : जनार्दन देवरे

(आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त या पुस्तकांच्या वेगळ्या,नव्या कविता ) जागतिक पुस्तक दिन वगैरे……… (उत्तरार्ध)       -१-  पुस्तके खुणावताहेत…  मला,तुम्हाला,सर्वांना- आपले जगण्याच्या बेडीत अडकलेले पाय मात्र वळत नाहीत तिकडे…. पुष्कळदा खिशास घालूनही साकडे… पुस्तकांपर्यत पोहचतच नाही व्यवहारी मन तोकडे..!       -२-  काचेच्या कपाटात सजलेली, वाचनालयांपर्यंत पोहचलेली पुस्तके वाट पाहताहेत जिवंत स्पर्शाची … कोणीतरी

2020, एप्रिल

शरद पाटलांची क्रांतिकारक कमिटमेंट : राजकुमार घोगरे

 शरद पाटलांची क्रांतिकारक कमिटमेंट    शपांचा चौथा खंड Primitive Communism, Matriarchy-Gynocracy and Modern Socialism ने भारतीय अॅकेडमिशियन्सवर ज्याप्रमाणात प्रभाव टाकला त्यापेक्षा अधिक प्रभाव आंतरराष्ट्रीय बुद्धिजीवीवर टाकला. त्या ग्रंथाच्या प्रचारात मोठा वाटा ‘वर्ल्ड मॅट्रिआर्कल स्टडीज’चा होता. त्यांनी त्यावरील अभ्यासासह त्याचा समावेश स्वित्झर्लंडच्या त्यांच्या मॅट्रिआर्काइव्हमध्ये करण्याची इच्छा व्यक्त करणे महत्वपूर्ण ठरले.  वर्ल्ड मॅट्रिआर्कल स्टडीजच्या जगभर पसरलेल्या नेटवर्कमध्ये तो ग्रंथ चर्चेचा

2020, एप्रिल

विषाणूपुढे हतबल मानवाला उमेद देणारी कविता : प्रा. जयसिंग गाडेकर

( परिचय : प्रा.सौ. मीनल सुरेश येवले, एम. ए.मराठी,राज्यशास्र,समाजशास्त्र बी.एड.एम.फिल. पद –  कनिष्ठ व्याख्याता ग्रामविकास कनिष्ठ महा.कुही             जि. नागपूर *प्रकाशित पुस्तके* * मोहोर    – कवितासंग्रह – 2007 * परिघ    – कवितासंग्रह – 2013 * आंदण   – ललितलेख संग्रह – 2017 * एकांताचे कंगोरे  – ललितलेख संग्रह – 2019

2020, एप्रिल

हिंदू मुस्लिम यांच्या वेदनेचा प्रवास : इंधन

  साधारणतः पन्नासच्या दशकात प्रकाशित झालेली हमीद दलवाई यांची ‘इंधन’ ही कादंबरी स्वातंत्र्यानंतरही जिवंत असलेल्या जातीयतेच्या म्हणजे हिंदू-मुस्लिम ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वेदना, येणारी अस्वस्थता आणि माणसा-माणसांचा तुटत जाणारा संबंध, निर्माण होणारी संशयीवृत्ती या सर्व गोष्टी परखडपणे मांडते.        वर्षानुवर्षे चालत आलेल्या हिंदू-मुस्लिम लढ्यावर भाष्य करणारी मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाची कादंबरी म्हणून ‘इंधन’कडे पाहिले जाते. 

2020, एप्रिल

अण्णाभाऊंची शाहीरी .. लोकगीतांचे नवे परिमाण- प्रभाकर साळेगावकर

।।अण्णाभाऊंची शाहीरी .. लोकगीतांचे नवे परिमाण।। शाहिरी कवितेच्या अविष्काराची मुळं यादवकालाच्या पुर्वीपासुन राजस्थानातुन आलेल्या भाटगिरीत रूतलेली आहेत.पारंपारिक शाहिरी कवितेला ब-या पैकी राजाश्रय आणि लोकाश्रय ही मिळाला हे लक्षात येते.अगदीच थोडक्यात  सांगायचे मःहणजे१७ व्या शतकाच्या उतरार्धापासुन पारंपरिक वाडःमयाच्या निर्मितीची सुरूवात आहे.यातील संत साहित्याने अध्यात्माचा विचार केला तथापि शाहिरांनी करमणूक विभाग संभाळताना पराक्रम ,प्रेम ,विरह याचे दर्जेदार

Scroll to Top