मोठया भावाबद्दल : पी. विठ्ठल
हे माझे मोठे भाऊ. प्रभाकर. खरं तर त्यांच्याविषयी मी यापूर्वीच लिहायला हवं होतं; पण नाही लिहिलं. लिहायलाही योग्य काळ, वेळ यावी लागते हेच खरं. भाऊ औरंगाबादच्या बजाज ऑटो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सुमारे साडेतीन दशके प्रदीर्घ कष्टाची नोकरी केल्यानंतर उद्या निवृत्त होत आहेत. वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी. एकोणविशे बासष्ट हे त्यांचे जन्म वर्ष. माझ्यापेक्षा सुमारे तेरा […]













